Nigdi News : निगडीतील भक्तीशक्ती उड्डाणपुलावरील वर्तुळाकार मार्ग उद्यापासून दहा दिवस बंद
अपघात वाढल्याने उपाय योजना करण्यात येणार
Pckhabar- निगडीतील भक्तीशक्ती उड्डाणपुलावर अपघात वाढत असल्याने वर्तुळाकार मार्ग उद्यापासून दहा दिवस बंद ठेवावा, व उर्वरित कामे पूर्ण करावी अशा सूचना महापौर उषा ढोरे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.
वर्तुळाकार मार्ग पूर्ण होऊनही उद्घाटन केले जात नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने 30 जून रोजी पूल वाहतुकीसाठी खुला केला होता. परंतु, पुलावर अपघाताच्या घटना घडत आहेत. अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पुलाची पाहणी केली.
उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक अमित गावडे, प्रा.उत्तम केंदळे, नगरसेवक सचिन चिखले, नगरसेविका शैलजा मोरे, कमल घोलप, शर्मिला बाबर, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे आदी उपस्थित होते.
महापौर ढोरे म्हणाल्या, पुलाचे काम अपूर्ण आहे. छोटी छोटी कामे बाकी आहेत. विरोधकांनी श्रेय घेण्यासाठी पुलाचे उद्घाटन केले. दिशादर्शक फलक नाहीत. स्पीड ब्रेकर टाकणे गरजेचे आहे. स्पीड लिमिटचे दिशा दर्शक फलक लावणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाने दहा दिवसांचा वेळ लागेल असे सांगितले आहे. त्यामुळे सुरक्षिततेची कामे करण्यासाठी पूल दहा दिवस बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.










Leave a Reply