Pimpri News : मेट्रो स्टेशनच्या बांधकामाचा काही भाग जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर ढासळला
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर सुरू असलेल्या पीसीएमसी मेट्रो स्टेशनच्या बांधकामाचा काही भाग जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर ढासळला. सुदैवाने यात जिवीतहानी झाली नाही. निष्काळजीपणा केल्याबद्दल मेट्रो ठेकेदारावर कारवाई करणार आहे.
रविवारी पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर सुरू असलेल्या पीसीएमसी मेट्रो स्टेशनच्या बांधकामाचा काही भाग जुना पुणे मुंबई महामार्गावर ढासळला.
जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून सतत वाहनांची रहदारी सुरू असते. मेट्रो स्टेशनच्या बांधकामाचा काही भाग थेट रस्त्यावर पडल्याने वाहनचालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
महामेट्रोचे जनसंपर्क अधिकारी डॉ. हेमंत सोनवणे म्हणाले, पीसीएमसी मेट्रो स्टेशन जवळ घडलेल्या घटनेची चौकशी महामेट्रोचा सेफ्टी विभाग करीत आहे. सेफ्टी विभागाने चौकशी केल्यानंतर या प्रकरणाची जबाबदारी निश्चित केली जाईल. चौकशीनंतर आलेल्या अहवालानुसार पुढील कारवाई केली जाईल. दरम्यान संबंधित ठेकेदारावर रीतसर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यापुढे अशी दुर्घटना घडू नये याबाबत काळजी घेतली जाईल, असेही सोनवणे यांनी सांगितले.










Leave a Reply