Talegaon Dabhade Crime News : गावगुंडाची तरुणांना जबर मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल
आम्ही ‘गाववाले आहोत, घरापर्यंत जावु देणार नाही’, पाण्यात बुडून मारण्याची दिली धमकी
Pckhabar- मित्रासह कुसगांव धरणावर बोटींग करण्यासाठी गेलेल्या तरुणांना केदारी यांची बोटिंग चालविणाऱ्या चार गावगुंडानी शिवीगाळ करत कोयत्याने, राॅडने, लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. तसेच आम्ही ‘गाववाले आहोत, घरापर्यंत जावु देणार नाही, पाण्यात बुडून मारील अशी धमकी दिली. ‘ ही घटना कुसगांव धरणावर (शनिवारी) सायंकाळी घडली.
आकाश राजेंद्र टेकाळे (वय-21, रा. थेरगाव) असे गंभीर जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्याने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार केदारी यांची बोटिंग चालविणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र शनिवारी कुसगांव धरणावर फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी ते बोटिंग करण्यासाठी थांबले असता केदारी बोटिंग चालविणाऱ्या आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना नीट थांबा असे बोलून शिवीगाळ केली. फिर्यादी आकाश यांनी काका शिव्या कशाला देता, निट बोला असे म्हणताच त्यांच्या पैकी एकाने त्याचे हातात असलेल्या कोयत्याने फिर्यादी यांच्या डोक्यात तर दुसऱ्या आरोपीने रॉडने डाव्या हातावर व इतर दोन आरोपींनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच आम्ही ‘गाववाले आहोत, घरापर्यंत जावु देणार नाही, पाण्यात बुडून मारील अशी धमकी दिली. ‘ फिर्यादीचा मित्र शुभम भिसे यास पाण्यात ढकलून दिले.
तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.










Leave a Reply