Article By Vitthal Dalvi : … तोच खरा या सुंदर सृष्टीमध्ये तरेल !

Article By Vitthal Dalvi : … तोच खरा या सुंदर सृष्टीमध्ये तरेल !
Pckhabar- सध्या पृथ्वीवर अदृश्य कोरोनारुपी हाहाकार पाहता मानव आपुले खरे जीवनच विसरुन गेला आहे. प्रत्येकजण धास्तीने जीवन जगत आहे. कसातरी या महाभयानक संकटातून मार्ग काढत आपुले जीवनाचे मार्गक्रमण करीत आहे. पृथ्वीवर प्रत्येकजण कोरोना जाण्याची वाट पाहत आहे. तरी हा अदृश्य कोरोना विषाणू पाठ सोडायला तयार नाही. सांगा पाहू काय करायचे काही यातून सावरण्याचा पर्यायच दिसत नाही. याच सुंदर सृष्टीसाठी प्रत्येकास आता काहीतरी सुंदर कार्य करण्याची वेळ आली आहे. यासाठी समाजामध्ये युद्धस्तरावर जनजागृती करण्याची गरज आहे. हीच आपुली पवित्रभूमी – सावरण्याची एक अमुल्य वेळ आहे.

जंगलातील ऑक्सिजनासाठी पोषक असणा-या वनस्पतींची अवैधरित्या सुरु असणारी वृक्षतोड थांबवून, कडुलिंब, वड, पिंपळ व चिंच अशा सजिवांना पोषक असणा-या वनस्पतींची पुन्हा नव्याने लागवड करणे गरजेचे आहे. शहरालगत झपाट्याने वाढणारी सिमेंटची जंगले कमी करुन जंगलामध्ये पशु-पक्ष्यांना व वन्यजीवांना सुंदर जागा देऊन प्राचीन वैदिक संस्कृतीतील औषधी वनस्पती गुळवेल यासारख्या वनस्पतींचा दैनंदिन जीवनामध्ये उपयोग व उपयोग करुन पवित्र प्राचीन संस्कृती व मराठी भाषेचा व थोर संतांच्या ग्रंथांचा पुन्हा स्विकार करुन, परकीय संस्कृतीच्या आहारी गेलेला मानव यातून सावरण्याची नितांत गरज वाटत आहे.

सध्या देशामधील सुरु असलेली विषयुक्त मानवी जीवनास आरोग्यास घातक असणा-या परदेशी औषधांचा त्याग करुन, अशा मानवी शरीरावर घातक औषधांवर बंदी आणावी. जनतेची फसवणूक व पिळवणूक थांबवावी. सर्वव्यापक जनजागृती करुन यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करुन आरोग्याच्या समस्यांमधून या पवित्र भूमीला सावरण्याची गरज आहे.

प्रत्येकाने यातून काहीतरी बोध घेऊन, मानवजाती व जीवसृष्टीचे रक्षण करुन समाजाभिमूख कार्य करावे. पवित्र हिंदू धर्मातील गो-मातेचे पुन्हा रक्षण करुन गो-मुत्रापासून औषधनिर्मिती व मल-मुत्रापासून उत्तम सेंद्रिय शेती करुन गो-मातेचे पालन करुन मानवजातीला आरोग्यदायी करण्याचे कार्य प्रत्येकाने सेवाभावी कार्य करणे हितकारक आहे.

अदृश्य कोरोना विषाणुमुळे समाजव्यवस्थेची झालेली हानी तसेच अर्थव्यवस्थेची घसरण यामुळे देशाचा आर्थिक कणाच मोडल्याचे दिसून येत आहे. यासाठी समाजानं काय करावे, अशा महाभयानक संकटातून बाहेर कसं पडावं, पवित्र प्राचीन संस्कृतीचं रक्षण कसं करावं, संतांप्रमाणे निस्वार्थी वृत्तीनं कसं जगावं, सेवाभावी वृत्तीनं कसं वागावं, प्रत्येक जीवामध्ये विश्वबंधुत्वाचा भाव जाणावां. मराठी भाषेचं रक्षण कसं करावं, याचसाठी जीवनभर व संपूर्ण जगभर आपुल्या संस्कृतीचा झेंडा फडकवणारे महान व्यक्तीमत्व स्वामी विवेकानंद यांचे विचार खरे होताना मात्र दिसत आहे.

जो भारतीय प्राचीन संस्कृतीचा अभ्यास करेल
जो भारतीय प्राचीन संस्कृतीच्या प्रमाणे आचरेल
जो भारतीय प्राचीन संस्कृती आत्मसात करेल
जो भारतीय प्राचीन संस्कृतीचा मान राखेल
जो मनापासून पवित्र ग्रंथ विचार वाचेल
ज्याला या सृष्टीमधील खरा अभाव दिसेल
तोच या सुंदर सृष्टीमध्ये तरेल…

श्री.विठ्ठल दळवी ,
कविभूषण ,
पंचक्रोशी हायस्कूल, दारुंब्रे- मावळ,
जि-पुणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *