Sad News : तब्बल 55 वर्ष आमदार असलेले शेकापचे गणपतराव देशमुख यांचे निधन

Sad News : तब्बल 55 वर्ष आमदार असलेले शेकापचे गणपतराव देशमुख यांचे निधन

Pckhabar-शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख  (वय-95 )यांनी आज, शुक्रवारी रात्री सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना अखेरचा श्वास घेतला.

गणपतराव देशमुख हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचारादरम्यान  त्यांची प्राणज्योत मालवली.

गणपतराव देशमुख हे सलग 55 वर्षे सांगोला विधानसभेचे सदस्य होते. एकाच पक्षात राहून एकाच मतदार संघातून सलग 11 वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदला गेला आहे. याची गिनीज बुकात देखील नोंद कऱण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *