Wakad Crime News : माझ्याकडे रोज पन्नास पोलीस येतात, असे म्हणत महिला पोलिसाशी हुज्जत
तरूणाला अटक
Pckhabar- विना मास्क फिरणाऱ्या एका दुचाकी चालक तरूणाला कारवाईसाठी महिला पोलिसाने अडवले असता तरूणाने शिवीगाळ केली. मी पावती फाडणार नाही, तुला काय करायचे कर, माझ्याकडे रोज पन्नास पोलीस येतात, अशी हुज्जत घालणाऱ्या तरूणाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार गुरूवारी रहाटणी फाटा येथे घडला.
राजू प्रकाश भाटी (वय-36, रा. औंधगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी रोहिणी किरण सुर्यवंशी (वय-34) यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या वाहतूक पोलीस असून गुरुवारी रहाटणी फाटा येथे वाहतूक नियमन करत होत्या. यावेळी आरोपी भाटी हा विना मास्क दुचाकीवरून जात होता. याला सुर्यवंशी यांनी थांबविले. आणि पावती फाडण्याची मागणी केली. यामुळे चिडलेल्या आरोपीने सुर्यवंशी यांना शिवीगाळ केली. मी पावती फाडणार नाही, तुला काय करायचे कर, माझ्याकडे रोज पन्नास पोलीस येतात, अशी हुज्जत घातली. वाकड पोलिसांनी अटक केली आहे.
वाकड पोलीस तपास करत आहेत.










Leave a Reply