Lonavala Crime News : सुप्रसिद्ध डॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर लाखोंचा दरोडा टाकणारे दरोडेखोर जेरबंद

 

Lonavala Crime News : सुप्रसिद्ध डॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर लाखोंचा दरोडा टाकणारे दरोडेखोर जेरबंद
Pckhabar- लोणावळा शहरातील सुप्रसिद्ध  डॉ . हिरालाल खंडेलवाल यांच्या घरावर 17 जुनच्या पहाटे दरोडा टाकत 67 लाखांचा मुद्देमाल लंपास केलेल्या दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पुणे ग्रामीणच्या एलसीबी पथकाला यश आले आहे . पोलीस पथकाने याप्रकरणी 15 आरोपींना अटक केली असून दोन अल्पवयीन बालके ताब्यात घेण्यात आली आहे . त्यांच्याकडून 30 लाख 50 हजार 200 रुपये व चोरीच्या पैशातून विकत घेतलेले 57 हजार 500 रुपयांचे तीन मोबाईल संच ताब्यात घेतले असल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली .

लोणावळा शहरातील प्रधानपार्क सोसायटीमध्ये हा दरोड्याचा प्रकार घडला होता . डॉ . खंडेलवाल व त्यांची पत्नी हे ज्येष्ठ दोघे त्यांच्या खोलीत झोपेलेले असताना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी त्यांना हत्यारांचा धाक दाखवत त्यांचे हात बांधून त्यांच्या डोळ्यासमोर घरातील 50 लाखांची रोकड व सोन्या चांदीचे दागिणे असा 66 लाख 77 हजार 500 रुपयांचा ऐवज पळविला होता . घरामधून बाहेर जाताना त्या चोरट्यांचे छायाचित्रण बंगल्याच्या सिसीटिव्ही मध्ये तसेच चौकांमधील सिसीटिव्ही मध्ये कैद झाले होते.

अतिशय गंभिर स्वरुपाचा हा गुन्हा असल्याने कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया व पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ . अभिनय देशमुख यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधिक्षक विवेक पाटील , सहायक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट , लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे व नेताजी गंधारे , पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर घोडगे व अमोल गोरे यांचेसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अंमलदार यांची तपास पथके बनवत तपास सुरू केला होता .

गुन्ह्याच्या ठिकाणचे व आजुबाजुच्या परीसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाद्वारे आणि गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकांनी गुन्हयाचा लोणावळा , मुंबई , सांताक्रूझ , हडपसर , पुणे शहर , अंधेरी , मालाड मुंबई येथे तपास करून एकुण 8 आरोपींना यापुर्वीच अटक केली होती . परंतु त्यांचेकडे तपासात गुन्हयातील मुख्य आरोपी हे मध्यप्रदेशात असून त्यांचेकडेच गुन्ह्यातील चोरीला गेला माल असल्याचे निष्पन्न झाले होते . त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उप निरीक्षक रामेश्वर धोंडगे व पोलीस अंमलदार सुनिल जावळे , शब्बीर पठाण , मुकुंद अयाधित , मंगेश थिगळे , बाळासाहेब खडके , मुकेश कदम , प्रकाश वाघमारे , महेश गायकवाड , निलेश कदम , अक्षय नवले यांचे तपास पथक मध्यप्रदेश येथे आरोपीचे शोधात 3 आठवडे तळ ठोकून होते . या पथकाने तसेच सचिन गायकवाड , राजु मोमीन यांच्या तांत्रिक मदतीने मध्यप्रदेश मधील सागर जिल्हयातील गंज बासौदा , राहतगड , सागर डांबरी येथे तपास करून गुन्हयातील 5 मुख्य आरोपी व 2 विधीसंघर्षीत बालके यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून गुन्हयातील चोरीला गेलेल्या मालापैकी 30 लाख 52 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल यामध्ये 6 लाख 26 हजार रोख व 23 लाख 68 हजार 700 रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिणे , गुन्ह्यातील 57 हजार 500 रुपयांचे विकत घेतलेले 3 मोबाईल फोन जप्त केले आहेत .

गुन्हयातील मुख्य आरोपी हेमंत रंगराज कुशवाह हा सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गोवा , मध्यप्रदेश , महाराष्ट्र व उत्तरप्रदेश या राज्यात घरफोडी , चोरी चे गुन्हे दाखल आहेत .

अटक आरोपींची नांवे

हेमंत रंगराज कुशवाह ( वय 24 रा . डाबरी ता . राहतगड जि . सागर मध्यप्रदेश ) , मधु साधु विश्वासराव देशमुख ( वय 52 वर्षे रा . औंढोली ता . मावळ जि . पुणे ) , सुनिल शंकर शेजवळ ( वय 40 वर्षे सध्या रा . घाटकोपर वेस्ट, मुंबई मुळ रा . लाखनगाव ता . आंबेगाव जि . पुणे ) , रविंद्र काशीराम पवार (वय 42 वर्षे रा . संभाजीनगर , अंधेरी वेस्ट मुंबई ) , शामसुंदर शिवनाथ शर्मा ( वय 43 वर्षे रा . आरे मिल्क कॉलनी , गोरेगाव पूर्व , मुंबई ) , मुकेश रमेश राठोड ( वय 45 वर्षे रा . भटवाडी , घाटकोपर वेस्ट, मुंबई ) , सागर रमेश धोत्रे ( वय २५ वर्ष शंकर मठ , हडपसर पुणे ) , प्रशांत उर्फ हेमंत रंगराज कुसवाह उर्फ पटेल ( वय 27 वर्षे रा . डाबरी पो . चंद्रापुर ग्रामपंचायत बहादुरपुर ता . राहातगड जिल्हा सागर , राज्य मध्यप्रदेश ) , दिनेश जयराम अहिरे ( वय 38 वर्षे रा . कमला तिवारी चाळ पारशीवाडी , घाटकोपर ( प ) मुंबई ) , विकास शंकर मुख्य ( वय 34 वर्षे रा . सांताक्रुझ पूर्व , वाकोला , मुंबई ) , संजय भगवान शेंडगे ( वय 47 वर्षे रा . जवाहरमाई प्लॉट , भटवाडी , घाटकोपर ( प ) मुंबई ) , दौलत भावसिंग पटेल ( वय 24 वर्षे रा . डाबरी पो . चंद्रापुर ग्रामपंचायत बहादुरपुर ता . राहातगड जिल्हा साजर , राज्य मध्यप्रदेश ) , विजय चंद्रप्रकाश पटेल ( वय 21 वर्षे रा . वल्लभनगर वार्ड , शाहु चौक , जिल्हा सागर राज्य मध्येप्रदेश ) , गोविंद यामसिंग कुशवाह ( वय 18 वर्षे रा . डाबरी पो . चंद्रापुर ग्रामपंचायत बहादुरपुर ता . रहातगड जिल्हा सागर , राज्य मध्यप्रदेश ) , प्रदिप लल्लु धानुक ( वय 28 वर्षे रा . डाबरी पो . चंद्रापुर ग्रामपंचायत ( बहादुरपुरा रहातगड जिल्हा सागर राज्य मध्यप्रदेश )