Pawana Dam News : पवना धरणातून विसर्ग आणखी वाढविणार; ४६५० क्युसेक्स पाणी सोडण्यात येणार

Pawana Dam News : पवना धरणातून विसर्ग आणखी वाढविणार; ४६५० क्युसेक्स पाणी सोडण्यात येणार

नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरासह मावळवासियांची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात यावर्षी जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठ्याची झपाट्याने वाढ होऊन धरण 87 टक्के भरले आहे. मात्र, धरण परिसरात पावसाचा जोर पाहता आज (शुक्रवार) सकाळी 9 वाजता धरणातून
४६५० क्युसेक्स पाणी नदीत सोडले जाणार आहे. त्यामुळे नदी काठच्या गावातील नागरिकांना जलसंपदा विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पवना धरण परिसरात 1 जूनपासून 1774 मिलीमीटर पाऊस पडला आहे. गतवर्षी आजच्या तारखेला 502 मिलीमीटर पावसाची नोंदणी झाली होती.
गतवर्षी आज अखेर 33.94 टक्के इतका तर यावर्षी 87.41 टक्के पाणीसाठा झाला आहे. 24 तासात 1.04 टक्के पाणीसाठा वाढला आहे. तर एक जूनपासून धरणात 55.82 टक्के पाणीसाठा वाढला आहे.

चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने
दरवर्षी ऑगस्टमध्ये भरणारे पवना धरण यावर्षी जुलैमध्येच भरत आले आहे.
धरणामध्ये हाेणारी पाण्याची आवक
पाहता धरणाच्या सांडव्यावरुन गुरुवारी
३०१७ क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. धरण परिसरात पडणारा पाऊस लक्षात घेऊन यामध्ये वाढ करून विध्दुत जणित्राद्वारे १४०० क्युसेक्स
व सांडव्याद्वारे ३२५० क्युसेक्स असे
४६५० क्युसेक्स पाणी सोडण्यात आहे.

पवना धरणाच्या जवळील गावातील नागरीकांनी दक्ष राहुन नदी तीरावरील सर्व जनावरे, माेटारी, अवजारे व इतर सामुग्री त्वरीत सुरक्षित हलविण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *