कोरोनावर मात करून कर्तव्यावर परतणार्या पोलीस कर्मचार्यांचे फुलांच्या वर्षावात स्वागत
Pckhabar- कोरोना या रोगावर मात करून आपल्या कर्तव्यावर परतलेल्या पोलीस कॉन्स्टेबल खैरे आणि होमगार्ड ठुले या दोघांचे लोणावळा शहर पोलीस ठाण्यामध्ये फुले उधळून स्वागत करण्यात आले. लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत काँवत आणि पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव उपस्थित होते.
26 जून रोजी पोलीस कॉन्स्टेबल खैरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर दुसर्याच दिवशी कामाच्या निमित्ताने त्यांच्या संपर्कात आलेल्या होमगार्ड ठुले यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. मात्र हे दोघेही खर्या कोविड योध्याप्रमाणे यशस्वीरित्या या आजारावर मात करीत पुन्हा आपल्या कर्तव्यावर हजर झाले. त्यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत काँवत आणि पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत काँवत यांनी कोरोना या रोगाबाबत लोकांमध्ये पसरलेले गैरसमज दूर करण्याची गरज असल्याचे सांगत सोशल डिस्टनसिंग पाळणे आणि मास्कचा वापर करणे हे या कोविड काळात अनिवार्य असल्याचे सांगितले. तसेच या काळात आपले कर्तव्य बजावणार्या प्रत्येक पोलीस कर्मचार्याच्या पाठीशी संपूर्ण पोलीस दल ठामपणे उभे असल्याचे सांगितले.
कोरोनावर मात करून कर्तव्यावर परतणार्या पोलीस कर्मचार्यांचे फुलांच्या वर्षावात स्वागत










Leave a Reply