Pimpri News : उपायुक्तपदी अण्णा बोदडे, वामन नेमाणे, दिलीप आढारी यांना सहाय्यक आयुक्तपदी पदोन्नती

Pimpri News : उपायुक्तपदी अण्णा बोदडे, वामन नेमाणे, दिलीप आढारी यांना सहाय्यक आयुक्तपदी पदोन्नती
Pckhabar-पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांना उपायुक्त, प्रशासन अधिकारी वामन नेमाणे, दिलीप आढारी यांना सहाय्यक आयुक्तपदी यांच्यासह पाच कार्यकारी अभियंत्यांसह शहर अभियंतापदी (स्थापत्य)  उपसूचनेद्वारे पदोन्नती देण्यास महासभेने मान्यता दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची जुलै महिन्याची तहकूब सर्वसाधारण सभा आज (गुरुवारी) ऑनलाइन पार पडली.

महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.

वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र मंडपे, डॉ. शिवाजी ढगे, डॉ. अलवी सय्यद नासेर इब्राहीम यांना ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारीपदी बढती देण्याबाबतचा प्रस्ताव विषयपत्रिकेवर होता. या प्रस्तावाला सत्ताधाऱ्यांनी उपसूचना दिली.

महापालिका नगररचना विभागातील प्रशांत शिंपी यांना सहाय्यक संचालक नगररचना या पदावर तर सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांना सेवाज्येष्ठता, अनुभव, शैक्षणिक पात्रतेनुसार उपायुक्तपदी पदोन्नती देण्यात आली.

कार्यकारी अभियंता मनोज सेठिया, राजेंद्र राणे, शिरीष पोरेड्डी, ज्ञानदेव जुंधारे, प्रमोद ओंभासे यांना रिक्त होणा-या जागेवर सह शहर अभियंतापदी पदोन्नती देण्यास महासभेने उपसूचनेद्वारे मान्यता दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *