Pawana Dam News : पवना धरणातून ३५०० क्युसेक्स पाणी सोडण्यात येणार; नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा

Pawana Dam News : पवना धरणातून आज पाणी सोडण्यात येणार;
नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरासह मावळवासियांची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात यावर्षी जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठ्याची झपाट्याने वाढ होऊन धरण 85 टक्के भरले आहे. मात्र, धरण परिसरात पावसाचा जोर पाहता आज (गुरुवार) दुपारी चार वाजता धरणातून ३५०० क्युसेक्स वेगाने पाणी नदीत सोडले जाणार आहे. त्यामुळे नदी काठच्या गावातील नागरिकांना जलसंपदा विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे.

पवना धरण परिसरात 1 जूनपासून 1712 मिलीमीटर पाऊस पडला आहे. गतवर्षी आजच्या तारखेला 502 मिलीमीटर पावसाची नोंदणी झाली होती.
गतवर्षी आज अखेर 34.45 टक्के इतका तर यावर्षी 85.45 टक्के पाणीसाठा झाला आहे. 24 तासात 1.46 टक्के पाणीसाठा वाढला आहे. तर एक जूनपासून धरणात 53.86 टक्के पाणीसाठा वाढला आहे.

चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने
दरवर्षी ऑगस्टमध्ये भरणारे पवना धरण यावर्षी जुलैमध्येच भरत आले आहे. धरणामध्ये हाेणारी पाण्याची आवक पाहता धरणाच्या सांडव्यावरुन आज दुपारी ४ वाजता पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.  पवना धरणाच्या जवळील  गावातील नागरीकांनी दक्ष राहुन  नदी तीरावरील सर्व जनावरे, माेटारी, अवजारे व इतर सामुग्री त्वरीत सुरक्षित हलविण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

धरणातून साेडण्यात येणारा विसर्ग

विध्दुत जणित्राद्वारे १४०० क्युसेक्स
व सांडव्याद्वारे २१०० क्युसेक्स
एकुण ३५०० क्युसेक्स
पाणी सोडण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *