मावळासह पिंपरी चिंचवड शहरात चौथ्या दिवशीही मुसळधार पाऊस

मावळासह पिंपरी चिंचवड शहरात चौथ्या दिवशीही मुसळधार पाऊस
Pckhabar- मावळासह पिंपरी-चिंचवड शहरात सलग चौथ्या दिवशी वरूणराजा बरसत आहे. मावळ तालुक्याच्या सर्व विभागात मान्सूनचा मुसळधार पाऊस गेल्या चार दिवसांपासून सतत कोसळत आहे. या पावसामुळे  रखडलेल्या भात लावण्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. आतापर्यंत 10 हजार हेक्टर क्षेत्रातील भात लागवड पूर्ण झाल्या आहेत.
गेल्या चार दिवसापासून मावळात मान्सूनचा पाऊस कोसळत असून आत्तापर्यंत वडगाव येथे 459 मिलिमीटर, तळेगाव दाभाडे 341 मिलिमीटर, काले कॉलनी 625, खडकाळे 471 मिलिमीटर, कार्ला 881 मिलिमीटर, लोणावळा  1690 मिलिमीटर, तर शिवणे येथे 252 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे.
पश्चिम पट्ट्यातील सह्याद्री डोंगराच्या रांगावर पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्या ठिकाणी ओढे, नाले, धबधबे ओसंडून वाहू लागले लागले आहेत. पवना, इंद्रायणी, आंध्रा, कुंडलिका, सुधा या नद्यांना पूर आलेले आहेत.

 आतापर्यंत 80 टक्के शेतातील भात लागवड पूर्ण झालेल्या असून सहा, सात दिवसात शंभर टक्के भात लागवडी पूर्ण होतील असा अंदाज तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे आणि सुधाकर मोरे यांनी व्यक्त केला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *