Dehu News : रक्तदान शिबिरात 40 जणांचा सहभाग

Dehu News : रक्तदान शिबिरात 40 जणांचा सहभाग
Pckhabar- कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. अनेक रुग्णांना रक्ताची आवश्यकता आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्रीक्षेत्र इंदुरी येथील श्री दत्तात्रेय कानिफनाथ सेवा ट्रस्ट मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात 40 जणांनी रक्तदान केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयातील रक्तपेढीच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी श्री दत्तात्रेय कानिफनाथ सेवा ट्रस्टचे अध्यक्ष पुंडलिक महाराज गरुड, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक घनश्याम विष्णुपंत येडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री दत्तात्रेय कानिफनाथ सेवा ट्रस्टचे अध्यक्ष पुंडलिक महाराज गरुड म्हणाले”सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितही रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद दिला आहे. राज्यात रक्ताचा तुटवडा भासु नये यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान शिबिराच्या आयोजनाबाबत आवाहन केले होते. त्यानुसार हे शिबिर घेण्यात आले.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *