Dehu News : माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा
Pckhabar- भाजपाच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या आवाहनानुसार जाहिरात, हारतुरे व पोस्टरबाजी यावर खर्च न करता गोरगरीब जनतेची सेवा करून पंकजा मुंडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

पंकजाताईच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील देहूगाव येथील वृद्धाश्रमातील 30 वृद्धांची आरोग्य तपासणी, कोरोना किट, प्रथमोपचार किट व त्यांना जीवन आवश्यक वस्तू कोलगेट, अंगाची साबण, कपड्यांची साबण पॅराशूट तेल वाटप करून साजरा करण्यात आला. मोलाची साथ डॉ. अभय थोटे यांची साथ लाभली.
या समाजोपयोगी कार्यक्रमास अनिरुद्ध दादा काळोखे भाजयुमो अध्यक्ष मावळ, प्रा डॉ. रविंद्र दादा खेडकर, संभाजी भाऊ टिळेकर, रुपेश दादा सोनुने, प्रा विकास कंद, भागवत नाना खेडकर, सचिन काळोखे आदी उपस्थित होते.
त्यावेळी वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी ताईंच्या यशासाठी आणि दीर्घायुषासाठी ताईला आशीर्वाद आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे आयोजन पंकजाताई मुंडे यांचे कार्यकर्ते वैभव सुभाष राख आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान मावळ यांनी केले होते.










Leave a Reply