Maval News : अतिवृष्टीत मृत्यू झालेल्या तरूणाच्या कुटुंबाला आर्थिक मदत
Pckhabar-मावळ तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीदरम्यान सिरदे गावातील तरुणाचा दि. 23 जुलै रोजी पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. तरूणांच्या कुटुंबाला शासनाच्या वतीने चार लाख
आणि मावळचे आमदार सुनिल आण्णा शेळके युवा मंचाच्या वतीनेही आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला.

मावळ तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीदरम्यान सिरदे गावातील कै. बबुशा पांडुरंग कोकाटे यांचा दि.23 जुलै रोजी पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. आपदस्त मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना तात्काळ शासनाच्या वतीने चार लाख रुपयांचा आर्थिक सहाय्याचा धनादेश तहसील कार्यालय वडगाव येथे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या उपस्थितीत आज (बुधवार) देण्यात आला.
तसेच आमदार सुनिल आण्णा शेळके युवा मंच यांच्या वतीनेही आर्थिक मदतीचा धनादेश कोकाटे कुटुंबाला देण्यात आला.
यावेळी उद्योजक सुधाकर शेळके, माजी जि.प. सदस्य गुलाबराव वरघडे, संजय गांधी समिती अध्यक्ष नारायण ठाकर, शिरदे गावचे सरपंच दिलीप बगाड, पोलीस पाटील हिरा बगाड, ज्ञानेश्वर लक्ष्मण कोकाटे, नारायण मालपोटे, सिद्धार्थ दाभाडे, अजिंक्य टिळे, अमोल सावळे, सागर बोडके, किरण ठाकर, पवन भंडारी, अक्षय लोहोट उपस्थित होते.










Leave a Reply