Dehu News: दत्तात्रेय कानिफनाथ सेवा ट्रस्टच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना 300 वह्यांचे वाटप

Dehu News: दत्तात्रेय कानिफनाथ सेवा ट्रस्टच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना 300 वह्यांचे वाटप

Pckhabar- गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने
दत्तात्रेय कानिफनाथ सेवा ट्रस्टच्या वतीने इंदोरी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना 300 वह्यांचे वाटप करण्यात आले.

श्री दत्तात्रेय कानिफनाथ सेवा ट्रस्टचे अध्यक्ष पुंडलिक महाराज गरुड म्हणाले” कोरोना महामारी आणि लाॅकडाऊनमुळे अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. अनेकांचा रोजगार गेला आहे तर काही नागरिकांचे लहान- मोठे व्यवसाय बंद झाले आहेत. अशा परिस्थितीत अनेक पालकांना आपल्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य, त्यांच्या शाळेची फी भरणेही शक्य होत नाही.”

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र, कोरोनाची दुसरी लाट काही प्रमाणात ओसरल्यामुळे काही भागात प्रत्यक्षात शाळांना सुरुवात झाली आहे. यामुळेच
इंदोरी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना 300 वह्यांचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *