Pimpri News : २५ कोटींच्या विकास कामांना स्थायी समितीचा हिरवा कंदील

Pimpri News : २५ कोटींच्या विकास कामांना स्थायी समितीचा हिरवा कंदील
Pckhabar-महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या झालेल्या आणि  येणा-या सुमारे २५ कोटी ७६ लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची ऑनलाईन पध्दतीने सभा  पार पडली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते.

थेरगावातील बिर्ला हॉस्पिटलसमोरील हॉटेल होमटेलजवळील  रस्तारुंदीकरणात येणारे मराविवि कंपनीचे उच्चदाब  खांब व तारा स्थलांतरीत करणेकामी येणा-या ४२ लाख ४६ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

सेक्टर क्रमांक २३ केंद्रासाठी द्रवरूप क्लोरीन वायुचा वाढीव पुरवठा घेणेसाठी येणा-या ३८ लाख १२ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.२० एम.आय.डी.सी. तील उर्वरित रस्त्यांचे डांबरीकरण करण्याकामी येणा-या १ कोटी ९६ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.३२ मधील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याकामी येणा-या १ कोटी ८० लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.२४ मधील थेरगाव जलतरण तलाव प्रीटन्साईल शीटने कव्हर करण्यासाठी येणा-या १ कोटी ४५ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.१९ लिंक रोड येथील स्मशानभूमीमधील विद्युतीकरणाचे नुतनीकरण करणे आणि विद्युत दाहिनी करिता नवीन जनरेटर बसविण्याकामी येणा-या ३५ लाख ३० हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

इ क्षेत्रिय कार्यालय हद्दीतील मलनि:सारण नलिका मॅनहोल चेंबर्सची सफाई आधुनिक यांत्रिकी पध्दतीने करणेकामी येणा-या १ कोटी २९ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

वार्ड क्र.१८ स्मार्ट सिटी कार्यालयाकरीता पर्यायी उच्चदाब वीजपुरवठा करणे आणि विद्युत विषयक कामे करण्यासाठी येणा-या १ कोटी ५ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

अ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत एलआयजी मधील आतील रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे मध्ये  विद्युत विषयक कामे करण्याकामी येणा-या ५५ लाख २३ हजार  इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

ड क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील मलनिःसारण नलिका मॅनहोल चेंबर्सची सफाई आधुनिक यांत्रिकी पद्धतीने करण्यासाठी येणा-या १ कोटी २९ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. या विषयासह ऐनवेळच्या विषयास मान्यता देण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *