Dehu News : गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्तात्रेय कानिफनाथ ट्रस्ट मंदिरास उद्योजक विशाल परदेशी यांच्याकडून गोदान
Pckhabar-श्रीक्षेत्र इंदुरी नगरीमध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने परमपूज्य श्रद्धेय गुरुवर्य धर्मरत्न वासुदेव महाराज गरुड यांच्या कृपेने आणि परमपूज्य पुंडलिक महाराज गरुड यांच्या मार्गदर्शनाने श्री दत्तात्रेय कानिफनाथ ट्रस्ट मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
श्री दत्तात्रेय कानिफनाथ ट्रस्ट मंदिरामध्ये
गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिरात अभिषेक करण्यात आला. त्याचबरोबर श्री क्षेत्र देहू येथील उद्योजक विशाल परदेशी यांच्याकडून मंदिरासाठी गोदान करून गोमातेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी परदेशी कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
श्री दत्तात्रेय कानिफनाथ ट्रस्ट मंदिरामध्ये भजन आदी धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
उद्योजक विशाल परदेशी म्हणाले” आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गोमातेला मोठे स्थान आहे. गोमातेमध्ये 33 कोटी देव असतात, असे म्हटले जाते. त्यामुळे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून श्री दत्तात्रेय कानिफनाथ ट्रस्ट मंदिरास गोदान करण्यात आले आहे”.










Leave a Reply