Pawana Dam News : पवना धरण परिसरात पावसाचा जोर ओसरला; 84 टक्के पाणीसाठा

Pawana Dam News : पवना धरण परिसरात पावसाचा जोर ओसरला; 84 टक्के पाणीसाठा
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरासह मावळवासियांची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पवना धरण धरण परिसरात 24 तासात 35 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातधरणात 83.99 टक्के पाणीसाठा झाला आहे.

पवना धरण परिसरात 1 जूनपासून 1700 मिलीमीटर पाऊस पडला आहे. गतवर्षी आजच्या तारखेला 502 मिलीमीटर पावसाची नोंदणी झाली होती.
गतवर्षी आज अखेर 34.45 टक्के इतका तर यावर्षी 83.99 टक्के पाणीसाठा झाला आहे. 24 तासात 2.28 टक्के पाणीसाठा वाढला आहे. तर एक जूनपासून धरणात 52.40 टक्के पाणीसाठा वाढला आहे.

💦 गेल्या २४ तासात झालेला पाऊस = *35मि.मि.*

💦 १ जूनपासून झालेला पाऊस = *1700मि.मि.*

💦 गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = 502
💦 धरणातील सध्याचा पाणीसाठा = *83.99% टक्के*

💦 गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = * 34.45% टक्के*

💦 गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= *2.28% टक्के*

💦 १ जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = *52.40% टक्के*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *