Pimpri News: भाजपा नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन पुरग्रस्तांसाठी

 

Pimpri News: भाजपा नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन पुरग्रस्तांसाठी
Pckhabar- राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आल्याने नागरीवस्तीत पुराचे पाणी शिरुन जनजीवन पुर्णत: विस्कळीत झाले आहे. दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान होवून जिवितहानीही झाली आहे. नुकसानग्रस्त भागात नागरिकांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी एक महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे.

या नुकसानग्रस्त भागात उपाययोजना व मदतीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन पुरग्रस्तासाठी देण्याचा निर्णय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली.

राज्यात सर्वच ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शहरे व जिल्ह्यास पूरपरिस्थितीचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातुन विविध पातळ्यांवर मदतकार्य सुरु झाले आहे. तेथील नागरिकांच्या मदतीसाठी स्वच्छता व आरोग्य विषयक उपाययोजनांकरीता पिंपरी चिंचवड महापालिकेचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असल्याचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *