Nigdi News : कारगिल युद्धात पराक्रम गाजवलेल्या माजी सैनिकांचा शिवयोद्धा प्रतिष्ठानतर्फे सन्मान
Pckhabar-२६ जुलै १९९९, कारगिल विजय दिवस, जवळजवळ ५२७ भारतीय जवानांचे सर्वोच्च बलिदान आणि आपल्या सेनेचा अतुलनीय पराक्रम याचे फळ म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतही भारताने पाकिस्तानवर मिळवलेला अविस्मरणीय विजय. हा विजय दिवस साजरा करण्यासाठी आणि सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिवयोद्धा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल तुकाराम भालेकर यांच्या माध्यमातून कारगिल युद्धात पराक्रम गाजवलेल्या माजी
सैनिकांचा सन्मान करण्यात आला.
प्रत्यक्ष कारगिल युद्धात पराक्रम गाजवलेले माजी सैनिक बाळाराम उत्तेकर, बळीराम गोळे, प्रभाकर सपकाळ, महाडिक मामा, शेलार मामा यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते हनुमंत जाधव, रविराज शेतसंधी, अरुण सोनवणे उपस्थित होते.
या सर्वांच्या तोंडून कारगिल युद्धाच्या आठवणी ऐकताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. देशाविषयी आणि सैन्याविषयी त्यांना असलेला अभिमान ओसंडून वाहत होता. तरुण पिढीला अतिशय मोलाचे मार्गदर्शन लाभले.
शिवयोद्धा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल भालेकर म्हणाले “कुणालातरी आमची आठवण आली…” हे त्यांचं वाक्य ऐकून मनाला खंत वाटली. रुपीनगर भागात हे भारतमातेचे वीर सुपुत्र राहतात याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांचे उपकार कधीही न फिटणारे आहेत, त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद असेच लाभावेत. समाजात सैन्याविषयी आदर आणि प्रेम असेच वृद्धिंगत होत राहावे यासाठी प्रयत्न करणार.” असे नमूद केले.

या कार्यक्रमाचे नियोजन आशिष मोटे, दर्पण येवले, राकेश बिराजदार यांनी केले.










Leave a Reply