Maval News : पूरग्रस्त नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अत्यावश्यक साहित्य
Pckhabar-रायगड जिल्ह्यात निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे मोठे संकट नागरिकांवर कोसळले आहे. तेथील नागरिकांचे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ यांच्या वतीने ‘मदत नव्हे कर्तव्य’ या उपक्रमांतर्गत पूरग्रस्त नागरिकांना अत्यावश्यक साहित्य पाठविण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने पिण्याचे पाणी, ब्लँकेट्स, साड्या, इतर खाद्यपदार्थ असे जीवनावश्यक साहित्य मावळ तालुक्यातुन रायगड जिल्ह्याकडे रवाना करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्र कोकणवासीयांच्या मदतीला धावून आला आहे. अशा संकटकाळात सामाजिक बांधिलकी जपत शक्य ती मदत करणे हीच खरी माणुसकी असल्याचे मावळचे आमदार सुनील शेळके म्हणाले.
यावेळी आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठलराव शिंदे, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाषराव जाधव, रायगड जिल्हा निरीक्षक रुपाली दाभाडे, नगरसेवक सुनिल ढोरे, चंद्रजीत वाघमारे, पंढरीनाथ ढोरे, राजेश बाफना, संजय गांधी समिती अध्यक्ष नारायण ठाकर, मावळ खादी ग्रामोद्योग संघ अध्यक्ष अंकुश आंबेकर, रोहिदास गराडे, माजी उपसरपंच प्रकाश आगळमे, मावळ तालुका संघटक ज्योती जाधव, सोमनाथ धोंगडे, विकी ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते.










Leave a Reply