पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे 1 हजार 12 नवे रूग्ण, 24 जणांचा बळी
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या चार ते पाच दिवसांत एक हजारच्या आत रूग्ण सापडत होते. मात्र, गुरूवारी पुन्हा रूग्ण संख्या एक हजारच्या पार गेली आहे. कोरोनाचे तब्बल 1 हजार 12 नवे रूग्ण आढळले. कोरोना रूग्ण संख्येने 26 हजारी ओलांडली आहे. तर 24 जणांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी 266 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
शहरात 26 हजार 118 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 7 हजार 40 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात मंगळवारअखेर 17 हजार 673 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत 545 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मनपा हद्दीतील 444 तर 101 मनपा हद्दीबाहेरील आहेत.
गुरूवारी 1 हजार 801 संशयित रूग्णांना महापालिकेच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. 757 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. 1 हजार 703 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. विकासनगर किवळे (पुरुष 77 वर्षे), पिंपरी (पुरुष 63 वर्षे, पुरुष 46 वर्षे, पुरुष 52 वर्षे), चिंचवड (स्त्री 62 वर्षे, पुरुष 64 वर्षे, पुरुष 36 वर्षे, स्त्री 65 वर्षे), भोसरी (पुरुष 86 वर्षे), कासारवाडी (पुरुष 70 वर्षे), थेरगाव (स्त्री 65 वर्षे, थेरगाव 49 वर्षे), मोशी(स्त्री 60 वर्षे, पुरुष 74 वर्षे), काळेवाडी (स्त्री 64 वर्षे), दापोडी (स्त्री 70 वर्षे), निगडी (पुरुष 70 वर्षे), दिघी (स्त्री 70 वर्षे), नेहरुनगर (पुरुष 75 वर्षे), रुपीनगर (पुरुष 45 वर्षे), चर्होली (पुरुष 59 वर्षे), नारायणगाव (पुरुष 85 वर्षे), शिरुर (पुरुष 36 वर्षे), येरवडा (पुरुष 75 वर्षे) येथील 24 रहिवाशांचा मृत्यू झाला आहे. शहरातील 18 हजार 528 घरांना भेटी देऊन 57 हजार 765 जणांचे सर्व्हेक्षण करण्यात आले.
दरम्यान, शहरात गेल्या चार ते पाच दिवसांत एक हजारच्या आत रूग्ण सापडत होते. मात्र, गुरूवारी पुन्हा रूग्ण संख्या एक हजारच्या पार गेली आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असल्याने ही चिंतेची बाब आहे. कोरोनामुळे तब्बल गुरूवारअखेर 545 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर मृत्यू होणार्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे.
सध्या शहर परिसरात पाऊस सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त मास्क जवळ बाळगावा, असे आवाहन वैद्यकिय विभागाने केले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे 1 हजार 12 नवे रूग्ण, 24 जणांचा बळी










Leave a Reply