Pimpri News : पे अँड पार्किंगच्या नावाखाली सुरू असलेली पठाणी वसुली बंद करण्याची मागणी
Pckhabar- पिंपरी चिंचवड शहरात पे अँड पार्किंगच्या नावाखाली सुरू असलेली पठाणी वसुली तत्काळ बंद करावी, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील, महापौर उषा ढोरे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पालिकेचे पदाधिकारी,नगरसेवक, बगलबच्चे, कार्यकर्ते यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शहरातील करदात्या नागरिकांना विश्वासात न घेता 1 जुलै पासून पे अँड पार्किंग या योजनेची अंमलबजावणी सुरू केली.
महापालिका, एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या विकास आराखड्यातील वाहनतळाच्या जागा विकसित केलेल्या नाहीत. तसेच पिंपरी-चिंचवड शहराच्या मुख्य रस्त्याच्या लगत ज्या बांधकाम परवानगी घेऊन इमारती उभारल्या आहेत. त्या सर्व इमारतींपैकी निम्म्यापेक्षा अधिक पार्किंगच्या जागांचा व्यावसायिक वापर होत आहे. एमआयडीसी क्षेत्रात नाममात्र दराने वाहनतळाच्या जागा नेतेमंडळींनी अवैध मार्गाने गिळंकृत केल्या. त्याचा गैरवापर केला. त्यातून शेकडो कोटी रुपये कमावले. या सगळ्या अवैध प्रकरणांबाबत प्रशासनाने अर्थपूर्ण दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अगोदर या सर्व जागा ताब्यात घेऊन त्या विकसित करण्यात याव्यात व त्यानंतर पे अँड पार्किंग धोरणाबाबत विचार करावा.










Leave a Reply