Dehu Crime News : देहूगावात साडेसहा लाखांची घरफोडी

Dehu Crime News : देहूगावात साडेसहा लाखांची घरफोडी
Pckhabar-अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 6 लाख 60 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी देहूगाव येथे  रात्री सात ते नऊ वाजताच्या कालावधीत घडली.

देविदास शिवाजी जाधव (वय 45, रा. विघ्नहर्ता सोसायटी, विठ्ठलनगर, देहूगाव) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सात ते नऊ वाजताच्या कालावधीत फिर्यादी यांचे घर कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. फिर्यादी आणि त्यांच्या आईच्या बेडरूममधील लाकडी कपाटातून 3 लाख 60 हजार रुपयांचे 12 तोळे सोन्याचे दागिने आणि तीन लाख रुपये रोख रक्कम असा एकूण 6 लाख 60 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.
देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *