Dehu News : अमोल काळोखे यांच्या वाढदिवसानिमित्त माई बालभवन येथील अनाथ व दिव्यांग मुलांसाठी किराणा साहित्य
Pckhabar-देहू पंचक्रोशी बैलगाडा संघटनेचे सदस्य व अभंग प्रतिष्ठानचे सदस्य अमोल नामदेव काळोखे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त शिरगाव येथील माई बालभवन येथील अनाथ व दिव्यांग मुलांसाठी किराणा साहित्य देण्यात आले.
कोरोनाच्या काळात वाढदिवस अशा सेवाभावी सामाजिक संस्थांमध्ये साजरा करण्याच्या या उपक्रमांमुळे समाजापुढे एक चांगला आदर्श व संस्थांनाही सहकार्य लाभत आहे याचे समाधान संस्थेचे व्यवस्थापक मधुकर इंगळे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रम प्रसंगी शिरगावचे पोलीस पाटील समीर शेख, माजी उपसरपंच स्वप्निलआप्पा काळोखे, रा.यु.काॅ. मावळ ता. उपाध्यक्ष सचिन काळोखे, प्रशांत नाना मोरे, वि.वि.कार्य.सोसायटी व्हा.चेअरमन नारायण पचपिंड, लक्ष्मण काळोखे, सुहास काळोखे, आदेश बोत्रे, प्रा. विक्रम भोईटे, प्रा.विकास कंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन देहू पंचक्रोशी बैलगाडा संघटना व अभंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आले.










Leave a Reply