Dehu News : गुरुपौर्णिमेनिमित्त जिजाबाई कन्या विद्यालयात Online कार्यक्रम
Pckhabar- गुरुपौर्णिमेनिमित्त संत जिजाबाई कन्या विद्यालयात Online कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थिनींनी विविध भेटकार्ड बनवली आणि आपल्या पालकांना गुरुपौर्णिमेनिमित्त देऊन शुभेच्छा दिल्या.
त्याचबरोबर अनेक विद्यार्थिनींनी गुरुंना शुभेच्छा दिल्या आणि गुरुंप्रती आपली कृतज्ञताही व्यक्त केली. इ.7 वीच्या विद्यार्थिनींनी याप्रसंगी एक सुंदर नृत्यही सादर केले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वडाळकर मॅडम, पर्यवेक्षक आनंदराव तांबे सर यांनी विशेष मार्गदर्शन केले. सर्वांना गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका पठाण मॅडम यांनी याप्रसंगी गुरुंची थोरवी, त्यांचे आपल्या जीवनातील अनन्यसाधारण महत्व आपल्या मनोगतामध्ये सांगितले. विद्यालयाच्या उपशिक्षिका आडकर मॅडम यांनी यादिनाच्या निमित्ताने त्यांनी स्वतः लिहीलेली एक कविता ‘गुरु’ सादर केली आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.










Leave a Reply