Maval News : कोरोना लसीकरण मोहीम सुरळीत करण्यासाठी भाजपचे आंदोलन

 

Maval News : कोरोना लसीकरण मोहीम सुरळीत करण्यासाठी भाजपचे आंदोलन

Pckhabar-कोरोना लसीकरण मोहीम सुरळीत आणि प्रभागनिहाय
व्हावी या मागणीसाठी वडगाव मावळ येथे तळेगाव शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष रविंद्र माने यांच्या नेतृत्वात पंचायत समिती कार्यालय वडगाव मावळ चौकात आज (सोमवार)पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

या उपोषणाला पाठींबा दर्शविण्यासाठी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, प्रशांत आण्णा ढोरे प्रभारी मावळ लोकसभा, देहू शहर प्रभारी कैलास आण्णा पानसरे, शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल, कार्याध्यक्ष प्रकाश रायबा मोरे इनामदार, सचिन काळोखे उपाध्यक्ष भाजप देहू शहर, सागर मुसूडगे सरचिटणीस , चित्रकार प्रेम राधाबाईबाबू माने अध्यक्ष भाजप कलाकार आघाडी, बाळासाहेब शेलार शहराध्यक्ष देहूरोड भाजप, बाळासाहेब झेंडे कार्याध्यक्ष देहूरोड शहर आधी उपस्थितीत होते.

उपस्थितांकडून राज्य सरकार तसेच प्रशासनाचा निषेध केला. कोविड लसीकरण संदर्भातील अनियमितता व शहरी भागात प्रभाग पद्धतीने लसीकरण करावे. ग्रामीण भागात गाव निहाय लसीकरण करावे म्हणजे जेणेकरून अबालवृद्धांची ससेहोलपट होऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *