Pimpri News : दिघी विकास मंच्याचा महापालिकेच्या वतीने गौरव
Pckhabar- दिघी विकास मंचाने सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रिडा व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विविध उपक्रम राबवून सामान्य नागरिकांच्या हितासाठी केलेल्या कार्याबद्दल पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने “सामाजिक कार्याचा गौरव ” हा पुरस्कार महापौर उषा माई ढोरे, उपमहापौर हिराबाई नानी घुले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर कक्षात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले, दिघी विकास मंचाचे अध्यक्ष हरिभाऊ लबडे , सुनिल काकडे , के के जगताप , विकी अकुलवार , समाधान कांबळे, दत्ता घुले , अभिमन्यु दोरकर , ज्ञानेश आल्हाट, पांडूरंग म्हेत्रे आदी सभासद उपस्थित होते.
दिघी विकास मंचाचे सभासद सातत्याने सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रिडा व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विविध उपक्रम राबवत आहेत. सामान्य नागरिकांच्या हितासाठी वेळोवेळी उपक्रम राबवत आहेत. कोरोना काळातही सभासदांची चांगले कार्य केले आहे.
महापौर ढोरे म्हणाल्या, ”दिघी विकास मंचाचे कार्य कौतुकास्पद आहे. सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मंचाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. सामान्य नागरिकांच्या हितासाठी मंच नेहमी कार्यरत असतो. मंचाच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. त्यांना पुढील कार्यासाठी मी शुभेच्छा देते”.
उपमहापौर नानी घुले म्हणाले, ”समाजहिताचे कार्य करणाऱ्यांचा संच म्हणजेच दिघी विकास मंच अशी दिघी परिसरात मंचाची ओळख आहे. कोणत्याही सामाजिक कार्यात मंचाचे पदाधिकारी पुढे असतात. सामाजिक कार्यात नेहमी अग्रभागी असतात. विविध क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे”.










Leave a Reply