Pimpri Crime News : नोकरीच्या अमिषाने तरूणाची दिड लाखांची फसवणूक
Pckhabar-शहरातील एका नामाकिंत कंपनीत नोकरी लावण्याचे अमिष दाखवून तिघांना संगनमताने एका तरूणाची दिड लाखांची फसवणूक केली आहे. हा प्रकार 26 सप्टेंबर 2020 ते 25 मार्च 2021 या कालावधीत घडला.
अशोक जाधव उर्फ यादव, जीवन गायकवाड आणि पाटील अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पलाश गणेशराव मौजे (वय-28, रा. सहकारनगर, पिंपळे गुरव) यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
आरोपी यांनी पलाश यांना शहरातील एका नामाकिंत कंपनीत नोकरी लावण्याचे अमिष दाखविले. त्यांचा विश्वास संपादन करून वेळोवेळी गुगल पे, फोन पेव्दारे 1 लाख 44 हजार रूपये घेतले. त्यांनी आरोपींना नोकरीबाबत विचारल्यानंतर उडवा-उडवीची उत्तरे दिली. नोकरी न लावता त्यांची फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करत आहेत.
Pimpri Crime News : नोकरीच्या अमिषाने तरूणाची दिड लाखांची फसवणूक










Leave a Reply