Talegaon Dabhade Crime News: बनावट चावीने एटीएम फोडले, साडेसात लाखांची रोकड चोरीला
Pckhabar-अभ्यिुदय बँकेचे एटीएम मशीन बनावट चावीने उघडून पासवर्ड टाकून त्याव्दारे एटीएममधील 7 लाख 52 हजार 300 रूपयांची रोकड चोरून नेली. ही घटना तळेगाव दाभाडे येथे शुक्रवारी रात्री घडली.
बँकेचे मॅनेजर राजु प्रभाकर कांबळे (वय-50, रा. गोधाईनगर, होम सोसायटी, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अनोळखी तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथे अभ्यिुदय बँकेच्या बाहेरच बँकेचे एटीएम मशीन आहे. अनोळखी तीन आरोपींनी शुक्रवारी मध्यरात्री बनावट चावीने एटीएम मशीन उघडले. पासवर्ड टाकून त्याव्दारे एटीएममधील 7 लाख 52 हजार 300 रूपयांची रोकड चोरून नेली. फौजदार मतकर तपास करत आहेत.










Leave a Reply