Pawana Dam News : पवना धरण परिसरात गतवर्षीपेक्षा आजअखेर 1 हजार मिलीमीटर अधिक पाऊस

Pawana Dam News : पवना धरण परिसरात गतवर्षीपेक्षा आजअखेर 1 हजार मिलीमीटर अधिक पाऊस

पवना धरण @75 टक्के

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरासह मावळवासियांची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे. धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. पवना धरण परिसरात गतवर्षीपेक्षा आजअखेर तब्बल 1 हजार मिलीमीटर अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे दरवर्षी ऑगस्टमध्ये भरणारे धरण यावर्षी जुलै मध्येच भरण्याची शक्यता आहे.

धरण परिसरात 24 तासात 54 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणात 74.64 टक्के पाणी साठा झाला आहे.

पवना धरण परिसरात 1 जूनपासून 1525 मिलीमीटर पाऊस पडला आहे. गतवर्षी आजच्या तारखेला 491 मिलीमीटर पावसाची नोंदणी झाली होती.
गतवर्षी आज अखेर 34.62 टक्के इतका तर यावर्षी 74.64 टक्के पाणीसाठा झाला आहे. 24 तासात 2.90 टक्के पाणीसाठा वाढला आहे. तर एक जूनपासून धरणात 44.05 टक्के पाणीसाठा वाढला आहे.

💦 गेल्या २४ तासात झालेला पाऊस = *54मि.मि.*

💦 १ जूनपासून झालेला पाऊस = *1525मि.मि.*

💦 गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = 491
💦 धरणातील सध्याचा पाणीसाठा = *74.64% टक्के*

💦 गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = 34.62% टक्के*

💦 गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= *2.90% टक्के*

💦 १ जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = *43.05% टक्के*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *