Bhosari Crime News : ATM फोडण्यात बॅकेच्या कॅशियरचा हात; चपलेवरून पोलिसांनी लावला छडा

Bhosari Crime News : ATM फोडण्यात बॅकेच्या कॅशियरचा हात; चपलेवरून पोलिसांनी लावला छडा
Pckhabar- भोसरीतील दि. सेवा विकास बॅकेचे ATM फोडण्यात बॅकेच्या कॅशियरचा आणि शिपायाचा हात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सीसीटीव्हीत दिसणाऱ्या चपलेवरून भोसरी पोलिसांनी आरोपींचा काही तासातच छडा लावला आहे. चार आरोपींना अटक करून 3 लाख 57 हजारांची रोकड जप्त केली.

याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत माहिती दिली.
बँकेचा रोखपाल रोहित बिनदास काटे आणि शिपाई रोहित महादेव गुंजाळ (रा. पिंपरी) यांच्यासह आनंद चंद्रकांत मोरे आणि सचिन शिवाजी सुर्वे (रा. पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. भोसरी येथे सेवा विकास सहकारी बँकेची भोसरी शाखा आहे. शनिवारी  मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या दोन

चोरट्यांनी बँकेचे एटीएम मशिन उघडून आतील १५ लाख ४२ हजार रूपयांची रोकड चोरून नेली. या प्रकरणाचा तपास करताना पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज
तपासले असता एटीएम मशिन न फोडता रोकड चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
त्यावरून यात बँकेतील कर्मचा-यांचाच सहभाग असल्याचा संशय पोलीसांना आला. त्यावरून पोलीसांनी बँकेतील कर्मचा-यांकडे चौकशी सुरू केली.

चौकशीत पोलीसांना आरोपी गुंजाळचा संशय आला. मात्र तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलीसांनी त्याचा मोबाईल तपासला. मोबाईलमध्ये त्याचा आनंद
मोरेसोबत एक फोटो होता. हा फोटो आणि सीसीटीव्हीत दिसणारा चोरटा याच्या पायातील चप्पत एकसारखी दिसून आली. त्यानुसार, पोलिसांनी आंनद मोरे याला ताब्यात घेतले. त्याने त्वरीत गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर इतर
आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *