Pimpri News : 15 महिन्यांच्या अन्वीचा दुर्मीळ आजाराशी लढा
उपचारासाठी 18 कोटी रुपयांची गरज, उपचारासाठी हवेत दानशुरांचे हात
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील रहाटणी येथे राहणार्या सुरज आणि आरती वाव्हळ यांच्या पंधरा महिन्याच्या अन्वीला ‘स्पायनल मस्क्युलर ट्रॉफी टाइप’
S.M. टायप-1 या अत्यंत दुर्मिळ जनुकीय आजाराचे निदान झाले आहे. या आजारातून तिला बरे होण्यासाठी 18 कोटींच्या जनुक थेरपीची लस आवश्यक असून उपचारासाठी तेवढा खर्च येणार असल्याचे अन्वीच्या कुुटुंबाने सांगितले. अन्वीचे आई-वडील सामान्य कुटुंबातील असल्याने त्यांना उपचारासाठीची इतकी मोठी रक्कम उभारणे शक्य नसल्याने त्यांनी मदतीचे आवाहन केले आहे.

आरती आणि सूरज यांचे अन्वी हे पहिले अपत्य आहे. अन्वीला हा आजार असल्याचे दोन आठवड्यापुर्वीच त्यांना समजले आहे. तिच्यावर सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा आजार झाल्यापासून अन्वीच्या हाता-पायात ताकद नाही. या आजारात शरीराला प्रोटीन्स मिळत नाहीत. हात पाय निपचित पडत जाऊन तो छातीपर्यंत पसरतो. त्यानंतर रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. या आजारावर झोलजेन्समा नावाचे औषध असून ते नोवर्टिस कंपनी तयार करते. हे औषध कंपनीकडून मागवावे लागते. त्याचा खर्च जवळपास 18 कोटी रुपये इतका आहे. या औषधाद्वारे जनुके बदलता येऊ शकतात.
अन्वीचे आई-वडील दोघेही खासगी कंपनीत कामाला असून आर्थिक परिस्थिती चांगली नाही. उपचारासाठी 18 कोटी जमल्यावर झोलजेन्समा औषध मागवता येणार आहे. त्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. मदत मिळाल्यावर अन्वीवर उपचार करणे शक्य होईल.
दरम्यान, काही दिवसांपुर्वीच भोसरीतील सौरभ शिंदे यांची मुलगी वेदिकालाही हा आजार झाला होता. त्यावेळी तिला 16 कोटींचे इंजेक्शन दिले होते. तशीच परिस्थिती अन्वीवर आली असून, तिला हे इंजेक्शन देणे गरजेचे आहे. पैसे जमा करण्यासाठी वाव्हळ कुटुंबाची धावपळ सुरू आहे.
कुटुंबीय व मित्र परिवारांनी सोशल मीडियावर अन्वीच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन करणार्या पोस्ट शेअर केल्या आहेत. आम्ही मदतीसाठी नातेवाईक, मित्र परिवार यांच्यासह इतरही ठिकाणी प्रयत्न करत आहोत. अन्वीला वाचविण्यासाठी दानशूर व्यक्ती, संस्था, पक्ष, राजकीय नेते आदींनी मदत करावी, असे आवाहन वाव्हळ कुटुंबाने केले आहे. मदत लिंकवरून व नंबरवर करू शकता.
Donate:
https://www.impactguru.com/fundraiser/help-anvi-suraj-wavhal
Bank ccount Details
Name : nvi Suraj Wavhal
ccount : 50100440238877
IFSC Code : HDFC0001795
Branch : HDFC Chinchwad
Suraj Wavhal (nvi’s Father)
Gpay/PhonePay/Paytm 9766188989










Leave a Reply