Mirabai Chanu Wins Medal :
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिले पदक; वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूला रौप्यपदक
Pckhabar- टोकियोमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला मीराबाई चानूने भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे. तिने वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजन गटात रौप्यपदक पटकावले आहे.
मीराबाई चानूने शानदार प्रदर्शन करत वेटलिफ्टिंगमध्ये स्नॅच प्रकारात 87 किलो वजन उचललं तर क्लीन अॅंड जर्कमध्ये मीराबाई चानूनं 115 किलो वजन उचलत पदकावर शिक्कामोर्तब केले. मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये भारताला ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात दुसरे पदक मिळवून दिलं आहे.
भारताकडून वेटलिफ्टिंगमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू आहे.
मीराबाईनं भारताला मिळवून दिलेल्या पहिल्या पदकानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह दिग्गज नेत्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.










Leave a Reply