Pawana Dam News : पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम; 66 टक्के पाणीसाठा
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरासह मावळवासियांची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे. धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. 24 तासात 227 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणात 66.75 टक्के पाणी साठा झाला आहे.

पवना धरण परिसरात 1 जूनपासून 1352 मिलीमीटर पाऊस पडला आहे. गतवर्षी आजच्या तारखेला 487 मिलीमीटर पावसाची नोंदणी झाली होती.
गतवर्षी आज अखेर 34.96 टक्के इतका तर यावर्षी 66.75 टक्के पाणीसाठा झाला आहे. 24 तासात 11.68 टक्के पाणीसाठा वाढला आहे. तर एक जूनपासून धरणात 35.16 टक्के पाणीसाठा वाढला आहे.

💦 गेल्या २४ तासात झालेला पाऊस = *227मि.मि.*
💦 १ जूनपासून झालेला पाऊस = *1351मि.मि.*
💦 गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = 487
💦 धरणातील सध्याचा पाणीसाठा = *66.75% टक्के*
💦 गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = 34.96% टक्के*
💦 गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= *11.68% टक्के*
💦 १ जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = *35.16% टक्के*










Leave a Reply