
Pimpri News : लायन्स क्लब निगडी पद्ग्रहन समारंभ उत्साहात; लायन्स क्लब निगडीच्या अध्यक्षपदी रामकृष्ण मंत्री
Pckhabar- लायन्स क्लब ऑफ पूना निगडी हा पिंपरी चिंचवड मधील सर्वात जूना क्लब असून गेली ३५ वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम, सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून सेवाकार्यात शहरामध्ये अग्रगण्य क्लब म्हणून गणला जातो.
सन 2021-22 या वर्षासाठी अध्यक्ष व कार्यकारी मंडळाचा पदग्रहण समारंभ नुकताच मर्यादित उपस्थितीत संपन्न झाला.
निगडी क्लबच्या अध्यक्षपदी रामकृष्ण मंत्री, सचिवपदी देविदास ढमे तसेच खजिनदारपदी मनीषा गायकवाड यांची नियुक्ती झाली असून समारंभात त्यांचा व कार्यकारी मंडळाचा शपथविधी घेण्यात आला.
पद्ग्रहन समारंभ अधिकारी म्हणून माजी मल्टिपल कौन्सिल चेअरपर्सन गिरीश मालपाणी यांनी कार्यकारी मंडळाला कर्तव्याचे मार्गदर्शन करीत पदाची शपथ दिली. याप्रसंगी व्यासपीठावर, विद्यमान अध्यक्ष, मारुती मुसमाडे, सचिव दुर्गाशंकर बेहेरा, जेष्ठ उद्योजक, लायन्सचे माजी प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, तसेच विभागीय अध्यक्ष मनोज बन्सल, उप विभागीय अध्यक्ष हर्ष नायर, कार्यक्रम प्रमुख दिलीपसिंह मोहिते, क्लब चे जेष्ठ सदस्य व जनसंपर्क अधिकारी हरिदास नायर व नूतन अध्यक्ष रामकृष्ण मंत्री, व गौरीलक्ष्मी मंत्री उपस्थित होते.
मारुती मुसमाडे यांनी मागील वर्ष सेवा कार्याची, उपक्रमांची सविस्तर माहिती दिली, व निधी संकलनासाठी तयार केलेले नियतकालिक “स्नेहबंध” चे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जाहिरातदार, लेखक साहित्यिक यांचा ही सन्मान करण्यात आला. ओमप्रकाश पेठे यांनी नूतन कार्यकारी मंडळाला शुभेच्छा दिल्या. “स्नेहबंध” नियतकालिक चे संपादन वसंतकुमार देशपांडे यांनी केले.
यावर्षाचा बेस्ट लायन अवॉर्ड दुर्गाशंकर बेहेरा यांना दिला गेला.
सूत्रसंचालन राजीव कुटे व मीनांजली मोहिते यांनी केले तर आभार दिलीपसिंह मोहिते यांनी मानले.
संपूर्ण कार्यक्रमासाठी, हृषीकेश मुसमाडे, आयशालीना बेहेरा, चंद्रशेखर पवार, सुदाम मोरे, अशोक येवले, सलीमभाई शिकलगार, शिवकन्या मुसमाडे, जयंत मांडे, जयश्री मांडे यांनी विशेष परिश्रम केले.







Leave a Reply