आदित्य बिर्ला रुग्णालय प्रशासनाकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप; स्टाफनर्स, आरोग्य सेवकांचे  भरपावसात आंदोलन

आदित्य बिर्ला रुग्णालय प्रशासनाकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप; स्टाफनर्स, आरोग्य सेवकांचे  भरपावसात आंदोलन

Pckhabar- चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालय प्रशासनाकडून मानसिक त्रास दिला जात आहे. बाऊंसरच्या माध्यमातून धमकाविण्याचा प्रयत्न केला जात असल्यचा आरोप करत रुग्णालयातील आरोग्यसेविका, सेवकांनी याविरोधात आज (गुरुवारी)भर पावसात रुग्णालया बाहेर धरणे आंदोलन सुरु केले आहे.

आरोग्यसेविका, सेवकांवर अन्याय केला जाते आहे. जेवन निकृष्ट दर्जाचे दिले जाते. ते देखील वेळेवर मिळत नाही. त्यामुळे स्टाफनर्स काम करण्यासाठी इच्छूक नाहीत. कोरोनात करत असलेल्या कामामुळे या महिन्यात वेतनात वाढ करण्याचे आश्वासन व्यवस्थापनाने दिले होते. पण, वेतन वाढले नाही. स्टाफ कमी आहे. नर्स नतसाना त्यांचे कपडे हाऊसकिपिंग कर्मचा-यांना दिले जातात आणि नर्स म्हणून ते रुग्णालयात फिरतात असा धक्कादायक आरोपही करण्यात आला आहे. यामुळे रुग्ण, रुग्णाच्या नातेवाईकाला ते नर्स असल्याचेच वाटत होते. आम्हाला दिली जाणारी कपडे व्यवस्थित दिली जात नाही. रोटेशन व्यवस्थित नाही. वाढीव वेतन दिले नाही.

रुग्णसेविका, रुग्णसेवकावर प्रचंड अन्याय होत आहे. कोविड रुग्णालयात सहा तासच ड्युटी करण्याचा निर्णय आहे. पण, आम्हाला सात-सात, 12-12 तास ड्युटी करावी लागत आहे. यामुळे ताण येत आहे. राजीनामा दिला तरी चालेल असे सांगतात. स्टाउ , बाऊंसरच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असाही आरोप केला. दिवसभर आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

याबाबत आदित्य बिर्ला रूग्णालय प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *