Pimpri News : मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त तारा सोफेश धोडपळे सेंटरला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
Pckhabar-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे विचार मंच, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे गुरव येथील तारा सोफेश धोडपळे सेंटरला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
तारा सोफेश धोडपळे सेंटरमधील दिव्यांग, निराधार मुला-मुलींसाठी या वस्तू देण्यात आल्या. यामध्ये फलोपहार, मास्क, सॅनिटाईझर, टॉवेल व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, विकास आघाव, अमोल नागरगोजे, लक्ष्मण वाघ, कैलास घुगे, समिर कोरबु, भक्तराम फड, गोरक्ष सानप, रवि बांगर, संजय कीर्तने, श्रीकृष्ण आंधळे, आकाश रोकडे, निवृत्ती चाटे आदी विचार मंचाचे कार्यकर्ते उपस्थित होते.










Leave a Reply