Dehu News : आदित्य गाडेच्या वाढदिवसानिमित्त बालग्राम आणि शिक्षणग्राम संस्थेला उपयोगी साहित्य भेट

Dehu News : आदित्य गाडेच्या वाढदिवसानिमित्त बालग्राम आणि शिक्षणग्राम संस्थेला उपयोगी साहित्य भेट
Pckhabar- कोरोनाच्या संकटकाळात अनाथ मुलांचे सेवाभावी कार्य करणाऱ्या संस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत अभंग प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष, सुरेश गाडे यांचे मोठे बंधू महेश गाडे यांचे चिरंजीव”आदित्य” याच्या सहाव्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मावळ तालुक्यातील भाजे येथील संपर्क बालग्राम संस्था व देवली येथील शिक्षणग्राम संस्था या दोन्ही सेवाभावी संस्थांना दैनंदिन उपयोगासाठी आवश्यक असणारे साहित्य भेट देण्यात आले.

हा उपक्रम भाजे व देवली या दोन्ही संस्थांमध्ये संपन्न झाला. अभंग प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. आजच्या काळामध्ये आपल्या कुटुंबातील वाढदिवस कशा पद्धतीने साजरा केला पाहिजे याचा सुंदर आदर्श गाडे कुटुंबीयांनी आपल्या प्रत्यक्ष उपक्रमातून दाखवून दिला आहे.

याप्रसंगी शिक्षणग्राम संस्थेच्या प्रमुख योगिता मून, देहूचे माजी उपसरपंच सचिन कुंभार, अभंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण काळोखे, उपाध्यक्ष सुरेश गाडे, महेश गाडे, साजनभाऊ दळवी, निलेश ढगे, प्रा. विकास कंद, उद्योजक प्रशांत हगवणे, गणेश मराठे, गाडे कुटुंबीय उपस्थित होते.

याप्रसंगी संस्थेच्या प्रमुख योगिताताई यांनी आजच्या या कोरोनाच्या संकट काळामुळे गेल्या दोन वर्षांपासून संस्थेला विविध उपक्रमातून मिळणारे सहकार्य कमी होत आहे. यामुळे संस्था चालवत असताना अनेक अडचणींचा सामना करून पुढे जावे लागत आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या संकट काळात अशा अनाथ मुलांच्या संस्थांना निश्चितपणाने विविध उपक्रमांच्या माध्यमातून सहकार्य व त्यांचा आवश्यक ती मदत करणे गरजेचे आहे, ही गरज ओळखून आपण संस्थेला सहकार्य केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

गाडे कुटुंबीयांनी अनाथ मुलांच्या संस्थेला सहकार्य करून समाजापुढे एक चांगला आदर्श ठेवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *