Talegaon Dabhade News : विद्यार्थ्यांच्या फी सवलतीसाठी आमदार शेळके यांच्याकडून विनाअनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळांना सहा लाखांचे अर्थसहाय्य

Talegaon Dabhade News : विद्यार्थ्यांच्या फी सवलतीसाठी आमदार शेळके यांच्याकडून विनाअनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळांना सहा लाखांचे अर्थसहाय्य
Pckhabar-विद्यार्थ्यांच्या फी सवलतीसाठी मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी पाच टक्के रक्कम स्वत: भरण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार
शेळके यांच्याकडून तीन विनाअनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळांना सहा लाखांचे अर्थसहाय्य सुपूर्त करण्यात आले.

यामध्ये सह्याद्री इंग्लिश स्कूल, जैन इंग्लिश स्कूल, कृष्णराव भेगडे इंग्लिश स्कूलचा समावेश असून यांना प्रत्येकी दोन लाखांचा धनादेश देण्यात आला आहे.

मावळ तालुक्यातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना फी सवलत देण्याबाबत झालेल्या शालेय प्रतिनिधी, व्यवस्थापकीय प्रतिनिधी व प्रशासकीय प्रतिनिधी यांच्याबरोबर झालेल्या समन्वयाच्या बैठकीत जाहीर केल्याप्रमाणे आमदार सुनिल शेळके यांनी विद्यार्थ्यांच्या एकूण फीच्या पाच टक्के प्रत्यक्ष देण्याचे कबूल केले होते.

तळेगाव दाभाडे येथील सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूलचे अध्यक्ष सुनिल भेगडे व सचिव दत्तात्रय नाटक, कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत काकडे, जैन इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष प्रकाश ओसवाल यांच्याकडे प्रत्येकी दोन लाखाचे धनादेश आमदारांचे बंधू सुदाम शेळके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी गोकुळ किरवे, मयूर झोडगे, संजय कासवा आदी उपस्थित होते.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील विनाअनुदानित शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना 35 टक्के सवलत देण्याबाबत सहमती झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *