Pimpri News : इंधन दरवाढी विरोधात शहर युवक काँग्रेसची सह्यांची मोहीम

Pimpri News : इंधन दरवाढी विरोधात शहर युवक काँग्रेसची सह्यांची मोहीम

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे  उद्या पिंपरीत
Pckhabar-पेट्रोल,डिझेल व गॅस च्या वाढत्या दरवाढीविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आज ११ जुलै पासून ते १५ जुलै पर्यंत राज्यव्यापी स्वरूपात नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबविण्यात येत आहे.

दैनंदिन स्वरूपात आपल्या उपजीविकेत व्यस्त असलेल्या नागरिकांच्या त्रासाबाबत व उद्रेकाबाबत नागरिकांच्या भावनांना आवाज मिळवून देण्यासाठी युवक काँग्रेस ने राज्यस्तरीय स्वरूपात या मोहीमेस सुरूवात केली आहे.

या बाबत माहिती देताना युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी सांगितले कि, “पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेस च्या वतीने या कालावधीत शहरात विविध ठिकाणी नागरिकांशी संपर्क साधून महागाई विरोधातील या आंदोलनात नागरिकांच्या सहाभागासाठी सह्या घेऊन पाठिंबा घेण्यात येणार आहे व या उपक्रमाच्या शुभारंभासाठी उद्या दि. १२ रोजी युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे पिंपरी चौकातील एच पी पेट्रोल पंपावर उपस्थित राहणार आहेत त्यांच बरोबर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, इंटक चे पुणे जिल्हा अध्यक्ष डॅा. कैलास कदम, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे सरचिटणीस व पुणे जिल्हा युवक काँग्रेस चे प्रभारी शिवराज मोरे, युवक काँग्रेस चे प्रदेश सचिव व पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस चे प्रभारी अक्षय जैन, कौस्तुभ नवले आदीं च्या प्रमुख उपस्थितीत मोहीमेचा शुभारंभ होणार आहे”
नागरिकांनी उत्सुफूर्तपणे या मोहीमेत सहाभागी होऊन केंद्र सराकरप्रती आपला निषेध नोंदवावा असो आवाहन बनसोडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *