कोरोनाचे शहरात 798 नवे रूग्ण; 301 जणांना घरी सोडले
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी कोरोनाचे 798 नवे रूग्ण आढळले. शहरात कोरोना रूग्ण संख्येने 25 हजारी ओलांडली आहे. तर 16 जणांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी 301 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी कोरोनाचे 798 नवे रूग्ण आढळले. शहरात कोरोना रूग्ण संख्येने 25 हजारी ओलांडली आहे. तर 16 जणांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी 301 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
शहरात 25 हजार 106 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 6 हजार 429 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात मंगळवारअखेर 17 हजार 407 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत 521 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मनपा हद्दीतील 423 तर 98 मनपा हद्दीबाहेरील आहेत.
बुधवारी 1 हजार 419 संशयित रूग्णांना महापालिकेच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. 192 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. 1 हजार 671 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. पुनावळे (पुरुष 68 वर्षे), दापोडी (स्त्री 60 वर्षे), भोसरी (पुरुष 75 वर्षे, स्त्री 45 वर्षे), कासारवाडी (पुरुष 63 वर्षे), पिंपळे गुरव (पुरुष 98 वर्षे, पुरुष 77 वर्षे, पुरुष 50 वर्षे, पुरुष 45 वर्षे), मोशी (स्त्री 53 वर्षे), सांगवी (पुरुष 53 वर्षे), निगडी (पुरुष 57 वर्षे), पिंपरी (पुरुष 60 वर्षे), आकुर्डी (स्त्री 63 वर्षे) किवळे (पुरुष 72 वर्षे) चाकण (पुरुष 50 वर्षे) येथील 16 रहिवाशांचा मृत्यू झाला आहे. शहरातील 22 हजार 214 घरांना भेटी देऊन 72 हजार 559 जणांचे सर्व्हेक्षण करण्यात आले.
Post Views: 227










Leave a Reply