
Mumbai News : 12 आमदारांवरील कारवाई योग्यच, राज्यपाल काहीच करू शकत नाहीत ; प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी केले स्पष्ट
Pckhabar- विधीमंडळ सभागृहात बेशिस्तीच्या वर्तनावरून भाजपच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे या निलंबित आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन कारवाई विरोधात दाद मागितली. मात्र, विधानसभा अध्यक्षांची ही कारवाई योग्यच असून राज्यपालही त्यावर काहीच करू शकत नाहीत, असे प्रसिद्ध वकील अॅड. असीम सरोदे यांनी स्पष्ट केले आहे.
अॅड. असीम सरोदे यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना हे मत व्यक्त केले आहे.
आज भाजपने या कारवाईच्या विरोधात विधानसभेबाहेर प्रतिविधानसभा भरवून निषेध नोंदवला आहे.
विधानसभा अध्यक्षांनी केलेली कारवाई योग्यच आहे. निलंबन व अपात्रता यामध्ये फरक असतो हे लक्षात घ्यावे. निलंबन मागे घेण्याचे राज्यपालांना काहीही अधिकार नसतात, असे सरोदे यांनी स्पष्ट केले आहे.










Leave a Reply