Mumbai News : फोन टॅपिंगसंदर्भात उच्चस्तरीय चौकशी केली जाईल – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

Mumbai News : फोन टॅपिंगसंदर्भात उच्चस्तरीय चौकशी केली जाईल – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

आमदार भास्कर जाधव यांना पोलीस संरक्षण देण्यात येणार

Pckhabar-विधानसभा सदस्य श्री.नाना पटोले यांनी आज विधानसभेत 2016-17 मध्ये ते खासदार असताना त्यांचा फोन टॅप करण्यात येत असल्याची माहिती दिली. हे प्रकरण गंभीर असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

श्री. वळसे-पाटील म्हणाले की, फोन टॅपिंग हे प्रकरण गंभीर असून याबाबत सविस्तर उच्चस्तरीय चौकशी करुन याबाबतचा अहवाल पुढच्या अधिवेशनात सादर करण्यात येईल असे नमूद केले.

विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांना पोलीस संरक्षण देण्यात येणार

वळसे-पाटील म्हणाले, विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांना संरक्षण पुरवण्याची मागणी काही विधानसभा सदस्यांनी विधानसभेत केली. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री श्री.वळसे-पाटील यांनी श्री. जाधव यांना पोलीस संरक्षण देण्याबाबत माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *