गणेश मंडळांना परवाने क्षेत्रिय कार्यालयांमार्फत दिले जाणार

गणेश मंडळांना परवाने क्षेत्रिय कार्यालयांमार्फत दिले जाणार
Pckhabar-
कोविड -19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. तसेच गणेश मंडळांना आवश्यक असणारे परवाने क्षेत्रिय कार्यालयांमार्फत उपलब्ध करून दिले जातील असे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी संगितले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कोरोना कोविड-19 साथरोगाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्षांची आज (बुधवार) ऑनलाईनव्दारे बैठक पार पडली.  ऑनलाइनद्वारे झालेल्या या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे, भुमि आणि जिंदगी विभागाचे प्रशासन अधिकारी मुकेश कोळप तसेच आदर्श मित्र मंडळ, काळेवाडी, श्रीकृष्ण गणेश तरुण मंडळ, काळभोर नगर, मधुबन सोसायटी, सांगवी तसेच अन्य गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी चर्चेत सहभाग घेतला होता.
अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे यांनी कोरोना कोविड – 19 साथरोगाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सार्वजनिक गणेशोत्सव 2020 मार्गदर्शक सूचनानुसार योग्य ती दक्षता घेण्याचे सार्वजनिक मंडळांना आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *