Dighi News : पुस्तक दान उपक्रमाला दिघीतील नागरिकांचा उदंड प्रतिसाद

Dighi News : पुस्तक दान उपक्रमाला दिघीतील नागरिकांचा उदंड प्रतिसाद

Pckhabar-घेऊ पुस्तक दान .., करु वही प्रदान या उपक्रमाच्या माध्यमातून दिघी विकास मंचाच्या आवाहनाला दिघीतील नागरिकांनी प्रतिसाद दिला. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते या हेतूनेच अनेक पालकांनी व विद्यार्थांनी इ.पहिली ते दहावी मराठी व इंग्रजी माध्यमांची असंख्य पुस्तके दान केली.

पुस्तक दान उपक्रमाच्या माध्यमातून नक्किच गरजू, होतकरु विद्यार्थांच्या पंखानां शिक्षणासाठी बळ मिळणार आहे.
या ज्ञानप्रसार पुण्यकार्यातील पालकानां व विद्यार्थांना मंचाच्या वतीने ” ज्ञानप्रसार दातृत्व प्रमाणपत्रक” व एक डझन वहीचा संच प्रदान करण्यात आला.

यावेळी दिघी विकास मंचाच्या वतीने दिघीतील नागरिकाना आवाहन करण्यात आले कि विद्यार्थांसाठी पहिली ते दहवी मराठी व इंग्रजी माध्यमाची शालेय पाठ्यपुस्तके शिक्षणासाठी विनाशुल्क मिळतील.

या कार्यक्रमासाठी दिघी विकास मंचाचे अध्यक्ष हरिभाऊ लबडे , सल्लागार सुनिल काकडे , सुखदेव वानखडे ,धनाजी खाडे , अभिमन्यु दोरकर , पांडूरंग म्हेत्रे , पुडलीक सौंदाणे , ज्ञानेश आल्हाट , प्रंशात कुर्हाडे उपस्थीत होते तर दत्ता घुले यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. विकी आकुलवार यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *