Wakad Crime News : वाकडमध्ये महिला पोलीसाची आत्महत्या

Wakad Crime News : वाकडमध्ये महिला पोलीसाची आत्महत्या
Pckhabar-वाकडमध्ये एका पोलीस कर्मचारी महिलेने आत्महत्या केली. ही घटना आज सोमवार उघडकीस आली.

श्रद्धा जायभाय (वय 28, रा. पोलीस वसाहत, वाकड) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलिसाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा जायभाय या पुणे शहर पोलीस दलात कार्यरत आहेत. त्या वाकडमधील पोलीस वसाहतीत राहत होत्या.

रविवारी रात्री त्यांनी राहत्या घरात आत्महत्या केली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.  वाकड  पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *