माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या आठवणींना डॉ. अंकुश जाधव यांच्याकडून उजाळा
Pckhabar- शिवाजीराव पाटील निलंगेकर हे महाराष्ट्राचे 1985-86 मध्ये मुख्यमंत्री होते. ते जेमतेम 8 महिने मुख्यमंत्री होते. डॉक्टर मुलीच्या संदर्भात कोर्टाच्या ताशेर्या नंतर त्यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले. त्यांच्याच कारकीर्दीत काँग्रेस पक्षाला 100 वर्षे झाली व त्यांच्याच कारकिर्दीत काँग्रेस शताब्दी अधिवेशन मुंबईत पार पडले होते , अशा शब्दात डाॅ. अंकुश जाधव यांनी आठवणींना उजाळा दिला आहे.
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आज पहाटे पुण्यात निधन झाले. पाटील यांच्या आठवणींना डॉ. अंकुश जाधव यांनी उजाळा दिला आहे.
डाॅ. जाधव पुढे म्हणाले, सत्ता गेल्यानंतर काय होते ते मी अनेक नेत्यांच्या बाबतीत जवळून पाहिले आहे. पाटील पोदार रुग्णालयाच्या जवळच असलेल्या आमदारांच्या वसाहतीत राहत होते. त्यावेळी ईएसआयएसमध्ये डॉ. शिंदे हे नाक, कान, घसा तज्ञ होते. त्याचे माझे तसेच पाटील साहेबांचे खूप संबंध. सत्ता गेल्यामुळे पाटील साहेबाकडे कोणी फारसे जात येत नव्हते. मुख्यमंत्री पद गेल्यानंतर पाटील साहेबांना काही वर्षांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व्हायचे होते. संध्याकाळच्या विमानाने त्यांना दिल्लीला सोनिया गांधींना भेटायला जायचे होते. परंतु सकाळपासून त्यांना सर्दी ने बेजार केले होते. डॉ. शिंदे त्यांच्या खास जवळचे असल्याने त्यांनी शिंदे यांना फोन केला. डॉ. शिंदे माझ्या संस्थेत आले व ते मला ही बरोबर घेऊन गेले. त्यांना मीच आयुर्वेदिक औषधे दिली आणि विशेष म्हणजे त्यांना दुपारपर्यंत फरक पडला व ते सायंकाळच्या विमानाने दिल्लीला गेले.
दोन दिवसांनी ते परत आल्यावर त्यांनी मला बोलवून घेतले. त्यानंतर त्यांच्याकडे सतत जाणे, येणे सुरू झाले. अनेक वेळा त्याच्या बरोबरजेवण केले. या काळात त्यांनी मुलीची कोर्ट केस, त्यामागील राजकारण व इतर बरीच राजकारणातील माहिती मला दिली. जाधव यांनी शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या आठवणींना डॉ. अंकुश जाधव यांच्याकडून उजाळा










Leave a Reply