Mumbai News : अधिवेशनाचा आज पहिला दिवस ; ठाकरे सरकारची अग्नी परीक्षा!
Pckhabar-महाराष्ट्र सरकारचे (Maharashtra Government) दोन दिवशी पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) आजपासून मुंबईत सकाळी 11 वाजता सुरू होत आहे. या अधिवेशनात विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन सरकारवर टीका करतील तर दुसरीकडे विरोधकांच्या टीकेवर महाविकासआघाडी सरकारचे नेते वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतील. या अधिवेशनात विरोधक आक्रमक पवित्रा घेणार असल्याने ठाकरे सरकारची अग्नी परिक्षा ठरणार आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची शक्यता जवळपास कमी असल्याने लक्षवेधी तारांकित प्रश्न -उत्तरेदेखील नसणार आहेत.
राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था, सध्याच्या कोरोना संकटात लोकांचे झालेले हाल, मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाले आहे अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर राज्य सरकारची कोंडी विरोधक करतील. तर दुसरीकडे ED च्या माध्यमातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून तिसरे समन्स मिळाले आहे. सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी देशमुख प्रयत्न करत आहेत.
देशमुख यांच्या मुद्द्यावरून देखील विधिमंडळामध्ये पडसाद उमटण्याची शक्यता आहे.










Leave a Reply